मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (12:36 IST)

आर्चीच्या प्रश्नांवर परश्या ने दिले हे उत्तर

aakash thosar
नागराज मंजुळे यांच्या गाजलेला चित्रपट सैराटने खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यातील आर्ची आणि परशा हे दोघे प्रेक्षकांच्या मनात आणि घरात पोहोचले. आर्ची  आणि परशाची भूमिका साकारणारे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना खूप प्रसिद्धी मिळाली असून ते लोकप्रिय झाले. चित्रपटानंतर त्यांच्यात काहीतरी गुपचूप  चालले आहे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. या वर एका कार्यक्रमात आकाश ठोसर म्हणजे परश्याने हजेरी लावली होती. त्यात परशाला आर्ची बद्दल प्रश्न विचारल्यावर त्याने मौन सोडले आणि तो म्हणाला आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. आम्ही सोबत फिरतो. एकमेकांशी गप्पा करतो. तू सध्या कोणाला डेट करत आहेस का असे विचारल्यावर त्याने मी स्वतःलाच डेट करत आहे असे सांगितले. आम्ही चांगले मित्र आहोत. आणि फोटो शेअर करत असतो. रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आर्ची आणि परशा लोकप्रिय झाले असेही आकाश म्हणाला . आकाश लवकरच घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात सायली पाटील सोबत दिसणार आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit