1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated: बुधवार, 2 मार्च 2022 (18:14 IST)

पावनखिंड चित्रपटाची कोटींची कमाई

सध्या पावनखिंड या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये 6 कोटींची कमाई केली आहे. 
 
पुष्पा या दक्षिण भारतीय चित्रपटांपाठोपाठ मराठी चित्रपटही आपली ताकद दाखवत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट पावनखिंड बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे .
 
मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेले पावनखिंड हे इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटात पावनखिंडाची लढाई दाखवली आहे. 
या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी प्रमुख भूमिकेत आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा सैन्याने पन्हाळगड ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्धी जोहर ने किल्ल्याभोवती सापळा रचला.त्यात मराठा सैन्यासह छत्रपती शिवाजी महाराज अडकले. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि मराठा सैन्याने आदिलशाही सल्तनतचा कसा पराभव केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण दिले. 
 
पावनखिंड चित्रपट 18 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या हा चित्रपट बॉक्स ऑफिससवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.15 कोटींची कमाई केली होती. शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत 80 टक्क्यांनी वाढ झाली. तर दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भावला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.