गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (14:31 IST)

Phulrani Motion Poster ‘फुलराणी’ची झलक, वाढदिवशी सुबोध भावेंची चाहत्यांना खास भेट

Phulrani Motion Poster release on Subhodh Bhave birthday
अभिनेता सुबोध भावे आज त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता सुबोध भावे कडून वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट मिळाली आहे. सुबोध भावेने आज त्याच्या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर रीलीज केले आहे. 
 
'फुलराणी' असं सिनेमाचं नाव असून या सिनेमात तो रोमॅन्टिक अंदाजात भेटीला येणार आहे. या सिनेमाची धुरा विश्वास जोशी ने सांभाळली आहे. 2022 मध्ये सिनेमागृहात हा रिलीज होणार असल्याची माहिती सुबोधने दिली आहे.
 
सुबोध भावे अभिनीत विश्वास जोशी दिग्दर्शित चित्रपट ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या कलाकृतीने प्रेरित आहे. या चित्रपटाला प्रियंका बर्वे, आनंदी जोशी, शरयू दाते, निलेश मोहरीर, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, हृषीकेश रानडे अशी गायक आणि संगीतकरांची तगडी फौज लाभली आहे. तर, गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटातील गीतांचे बोल लिहिले आहेत.