बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (14:37 IST)

जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी ' प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार

हिंदवी स्वराज्याचे निर्मिते छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षण करण्याचे काम अनेक छत्रपतींनी केले. परंतु त्या काळातील जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला तोड देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदीलशाही पुतर्तगीज, डच, इंग्रेज सिद्धी या सर्वांना लढा देत  स्वराज्याच्या रक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या छत्रपती महाराणी ताराराणी यांचे महत्वाचे योगदान असे. त्यांच्या अशा या उत्कृष्ट कर्तृत्वावरील आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी 'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला वर्ष 2022 मध्ये दिवाळीच्या सुमारास येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याला अबाधित राखण्यात छत्रपती ताराराणी यांचा मौल्याचा वाटा असून छत्रपती ताराराणी यांच्या बद्दल लोकांना फारशी माहिती नाही. त्यांच्या शौर्याबद्दल आणि त्यांच्या वीरतेबद्दल लोकांना माहिती मिळावी यासाठी प्लॅनेट मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट घेऊन येत आहे.
या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ.सुधीर कदम यांचे असून चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे.आणि या चित्रपटात  छत्रपती ताराराणी यांची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. सोनालीने भाऊबीजेच्या दिवशी सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. 

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि गोल्डन रेशियो फिल्म्स यांच्या प्रयत्नातून यूनाइडेड किंग्डम मधील 'ब्लॅक हँगर स्टुडिओ 'आणि 'ओरेवो स्टुडिओ हे 'मोगलमर्दिनी छत्रपती  ताराराणी या सिनेमाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करण्याची पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी लंडन मध्ये होणार असून हा हॉलीवूडचा पहिला मराठी चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  हा चित्रपट आता मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत देखील चित्रित होणार त्यामुळे आता हा चित्रपट साता समुद्रापलीकडे पोहचणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्रेक्षक मोठ्या पडद्यावर अनुभवतील. लोकांसमोर आपल्या महाराष्ट्राची वीरगाथा आणून महाराष्ट्राचा इतिहास सातासमुद्रापलीकडे लोकांना कळवा या साठी प्लॅनेट मराठी आणि संपूर्ण चित्रपटाची टीम खूप मेहनत घेत आहे.