1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (17:03 IST)

रसिका, आदित्य अडकली लग्नबंधनात; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

Rasika
रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. रसिकाने नुकताच त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.
 
रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या दोघांनी गोव्यात लग्न केले आहे. सप्तपदी घेतानाचा हा फोटो शेअर करत ‘१८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न’, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. त्या दोघांनी १८ ऑक्टोबर रोजी लग्न केले आणि आज ३० ऑक्टोबर रोजी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या लग्नात फक्त जवळच्या लोक होते.