शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (16:25 IST)

झोपण्यापूर्वी या 5 ब्युटी टिप्स अवश्य अवलंबववा, त्वचा नेहमी तजेलदार राहील

दिवसभराच्या थकव्यामुळे अनेक लोक आपल्या त्वचेसाठी काही करू शकत नाही, रात्री झोपण्यापूर्वी जर आपण त्वचेची काळजी घेतली तर त्वचा तजेलदार दिसते. या सोप्या ब्युटी टिप्स अवलंबवल्याने आपण त्वचेला तजेलदार करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 झोपण्यापूर्वी पाण्याने चेहरा धुण्यास विसरू नका -रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे आणि त्यात सर्वात पहिली गोष्ट येते, चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. त्वचेतील अशुद्धता काढून टाकण्यासाठी चेहरा धुणे अत्यन्त आवश्यक आहे. यासाठी आपण नेहमी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा थंड आणि स्वच्छ पाण्याने धुवूनच झोपावे.
 
2 हर्बल फेस मास्क वापरा - रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावलेला हर्बल फेस मास्क त्वचेला निरोगी आणि पोषण देतो. नियमितपणे एस मास्कचा वापर केल्याने त्वचेतील पोषक तत्वांसह आर्द्रता पुन्हा भरून निघते. जे आपल्या त्वचेसाठी प्रत्येक प्रकारे योग्य आहे. म्हणून नेहमी हर्बल फेसमास्क वापरा. 
 
3 डोळ्यांची विशेष काळजी घ्या - रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर क्रीम आणि आय ड्रॉप्स टाकायला विसरू नका. डोळ्याच्या पृष्ठभागाचा भाग हा सर्वात संवेदनशील भाग आहे, म्हणून त्याची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवरील काळे डाग घालवण्यासोबतच सुरकुत्या घालवण्यासाठी आय क्रिमचा वापर करणं खूप गरजेचं आहे , त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली क्रीम लावायला विसरू नका आणि डोळ्यात आयड्रॉप टाकायलाही विसरू नका. . यामुळे आपला दिवसभराचा थकवा दूर होईल. 
 
4 त्वचा मॉइस्चराइझ करायला विसरू नका-  कोरड्या त्वचेवर ओलावा परत आणण्यासाठी, त्वचेवर क्रीम, लोशन किंवा खोबरेल तेलाचा वापर करून  केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर संपूर्ण शरीराला मॉइश्चराइझ करू शकता. मॉइश्चराईझर लावून झोपल्याने त्वचेत ओलावा राहील आणि अकाली सुरकुत्याही दूर होतील. 
 
5 केसांची मालिश नियमितपणे करा- त्वचेसोबतच  रात्री झोपण्यापूर्वी केसांनाही मसाज करू शकता. असे केल्याने आपला दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि शांतपणे झोप लागेल. चांगल्या झोपेमुळे आपली त्वचा चमकू लागते.