1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:19 IST)

Nail Care Tips: हिवाळा सुरू होताच नखे तुटतात, अशी घ्या काळजी

nail care tips
हिवाळ्यात बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कोरड्या त्वचेच्या समस्येपासून ते केस तुटण्यापर्यंत या सर्व समस्यांमधून आपल्याला दररोज जावे लागते. हिवाळ्यात अनेकांना नखांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. थंडीमुळे नखे इतकी कमकुवत होतात की ती कोरडी होऊन तुटू लागतात. म्हणूनच आपण हिवाळ्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून नखे कोरडी होऊन तुटणार नाहीत. चला जाणून घेऊया अशा टिप्स ज्याद्वारे तुम्ही नखे तुटण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता-
 
कोल्ड क्रीम वापरा
हिवाळ्यात तुम्ही कुठूनही याल तेव्हा सर्वात आधी नखांवर आणि त्वचेवर क्रीम लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॉडी क्रीम किंवा कोल्ड क्रीम वापरू शकता. यासोबतच हायड्रॉक्सी अॅसिड, लॅनोलिन किंवा युरिया असलेले लोशन वापरण्याचा प्रयत्न करा. यानंतर थोडावेळ हलक्या हातांनी नखांना मसाज करा.
 
प्रचंड थंडीत हातमोजे घाला
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेचा नैसर्गिक मॉइश्चरायझर संपतो. अशा परिस्थितीत, जास्तीत जास्त वेळ घरी हातमोजे घालण्याचा प्रयत्न करा. रात्री झोपण्यापूर्वी नखांवर नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलची मालिश करायला विसरू नका.
 
नेल पेंट लावू नका
हिवाळ्यात नेल पेंट न लावण्याचा प्रयत्न करा. काही वेळा नेल पेंटमध्ये असलेल्या रसायनांचा तुमच्या नखांवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे नखे निर्जीव होऊन तुटू लागतात. हिवाळ्यात नेल पेंट लावणे टाळा हे लक्षात ठेवा.
 
आहार योग्य ठेवा आणि बायोटिन कॅप्सूल वापरा
हिवाळ्यात, योग्य खाणे आरोग्यासाठी आणि नखांसाठी खूप महत्वाचे आहे याची विशेष काळजी घ्या. यासोबतच, तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बायोटिन कॅप्सूल देखील घेऊ शकता. केस, त्वचा आणि नखांसाठी हे खूप फायदेशीर आहे.