सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (17:17 IST)

सौंदर्य वाढविण्यासाठी 5 व्हिटॅमिन्स, आहारात सामील करा

प्रत्येकास आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असते. परंतु आपणास माहित आहे का की चमकदार त्वचा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आहारात असे व्हिटॅमिन्स असणे फार महत्त्वाचे असते जे आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यात मदत करते. चला तर मग जाणून घेऊ या अशा 5 व्हिटॅमिन्स बद्दल ज्याला प्रत्येकाने आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे.

1 व्हिटॅमिन ए - व्हिटॅमिन ए हे त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी कार्य करतं. ह्याचे सेवन केल्यानं चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्यांचा आणि फुफ्फुसांचा कर्क रोग, सूर्यप्रकाशापासून होणाऱ्या दुष्प्रभावाला टाळण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर या मध्ये असलेले अँटीऑक्सीडेंटचे गुणधर्म त्वचेला सनबर्न पासून वाचवतात. व्हिटॅमिन ए बटाटे, गाजर, पालक आणि आंबा सारख्या खाद्य पदार्थां मध्ये मुबलक प्रमाणात आढळतं.
 
2  व्हिटॅमिन सी -व्हिटॅमिन सी त्वचेच्या कर्करोगाची शक्यता कमी करतं. शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण कमी झाल्यावर हिरड्यां मधून रक्त येणे सारख्या समस्या दिसून येतात. व्हिटॅमिन सी आंबट फळे, हिरव्या मिरच्या, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, ब्रसेल्स स्प्राउट्स सारख्या पालेभाज्या मध्ये आढळते.
 
3  व्हिटॅमिन बी 5- व्हिटॅमिन बी 5 त्वचेच्या पाण्याचे नुकसान रोखतो आणि त्वचेच्या प्रतिरोधक कार्यामध्ये सुधार करतो. हे त्वचेला कोरडे होण्यापासून रोखतो आणि त्वचेला मऊ ठेवतो. हे व्हिटॅमिन धान्य,अवाकाडो आणि चिकनचा सेवन केल्यानं मिळते.
 
4 व्हिटॅमिन के -त्वचेवरील जखमा आणि गडद मंडळे बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. व्हिटॅमिन के कोबी,केळी आणि दुधाचे सेवन केल्याने मिळते.
 
5 व्हिटॅमिन बी 3- व्हिटॅमिन बी 3 हे निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे. हे मेंदू, मज्जा संस्था आणि रक्तपेशींना निरोगी ठेवतात. या व्हिटॅमिन्सचे सेवन आपण त्वचेला चीर-तारुण्य ठेवण्यासाठी आणि त्वचेला चकचचित राखण्यासाठी करू शकता.