Nail Care Tips : 5 मिनिटात तयार करा नेलं सीरम,लावतातच हाताचे सौंदर्य वाढेल
मोठी आणि मजबूत नखे हातांच्या सौंदर्येत भर घालतात.लांब नखे असल्यास बोटे देखील लांब आणि नाजूक दिसतात.तसेच हात सुंदर दिसतात.बऱ्याचदा मुली नखांवर नेल पेंट जास्त काळ ठेवतात.एवढेच नव्हे तर नेलआर्ट देखील दोन किंवा तीन महिन्यासाठी करवतात.पण आपणास माहीत आहे का की चेहऱ्याप्रमाणे नखांची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.नाहीतर नखे देखील निर्जीव होतात आणि ते तुटू लागतात.असं आवश्यक नाही की महागडे उत्पादने वापरूनच नखे सुंदर बनवता येतात.आजीचे घरगुती उपाय देखील आजही खूप प्रभावी आहेत. चला तर मग जाणून घेऊया घरी नेल सीरम कसे तयार करावे जेणे करून नखांनाही चेहऱ्याप्रमाणे चमक मिळेल.
साहित्य - 1 टीस्पून कोरफड जेल, 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल,1टीस्पून नारळाचं तेल
कृती - एका भांड्यात सर्व साहित्य मिसळावे.त्यानंतर ते साहित्य एका डब्यात भरा.सीरम तयार आहे.आता आपण ते फ्रीजमध्ये ठेवू शकता.
नेल सीरम लावण्याची पद्धत-
सर्व प्रथम,आपली नखे चांगली धुवून पुसून घ्या.
यानंतर,सोललेली,कच्ची लसणाची पाकळी घ्या.
हलक्या हाताने घासून घ्या.कारण खूप जोराने घासल्याने जळजळ होऊ शकते.
10 मिनिटे तसेच सोडा.
या नंतर तयार केलेल्या नेल सीरमने मालिश करा.
सीरम 10 मिनिटे सोडा आणि नंतर धुवा.
मग बघा आपली नखे किती स्वच्छ आणि सुंदर दिसतात.
नेल सीरम लावण्याचे फायदे
* नेल सीरम लावल्यानंतर नखे स्वच्छ होत राहतात.
* नखांची चमक वाढते.
* नखे मजबूत होतीलआणि सुंदर दिसतील.