मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध
___रावांसोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद!
सुखी ठेवोत सर्वाना, ब्रम्हा, विष्णू, आणि महेश,
___रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
आकाशात उडतो पक्षांचा थवा,
______च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून,
___रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
___रावांचे नाव घेते___ची सून.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
___रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे
ज्यांची पाहिली होती वाट, ते सुख आले दारी,
___ रावांसोबत सुरु झाली आता, संसाराची स्वारी.
स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते,
___ रावांचे नाव आज, सर्वांसमोर घेते.
शब्दही न बोलता, साद घातली कुणी,
___ राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.
रंग हे नवे, गंध हे नवे,
___ रावांची साथ, मला ७ जन्मी हवे.
नको मोहन माळ, नको हिऱ्याचा हार,
___ रावांच्या जीवनात, मी सुखी आहे फार.
मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
___ रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.
सोन्याच्या बेसरीत, पाचूचा खडा,
___ राव अन माझा, ७ जन्माचा जोडा.
आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
___ च नाव घेते, राम कृष्ण हरी.