गुरूवार, 24 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: गुरूवार, 24 एप्रिल 2025 (17:15 IST)

हळदी कुंकू मराठी उखाणे Haldi Kunku Marathi Ukhane

सुवासिनींचा मेळ,
......रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ
 
हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
 
......रावांना आहे, सर्वींकडे खूप मान
 
हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
......रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल
 
हळदी कुंकूवाला आल्या साऱ्या महिला नटून,
 
......रावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून
 
कुंकू म्हणजे सौभाग्य
संसार म्हणजे खेळ,
......रावांचे नाव घेते आज आहे
हळदी कुंकवाची वेळ.
 
हळदीचा रंग आहे पिवळा,
आणि कुंकूचा लाल,
......रावांच्या जिवनात,
आहे मी खुशहाल
 
हळदी कुंकूसाठी,
जमल्या साऱ्या बायका,
.....रावांचे नाव घेते,
सर्वांनी ऐका
 
कुंकू म्हणजे सौभाग्य
संसार म्हणजे खेळ,
......रावांचे नाव घेते आज आहे
हळदी कुंकवाची वेळ
 
सृष्टी सौंदर्याच्या बागेला
चंद्र-सूर्य झाले माळी,
......रावांचे नाव घेते,
हळदी-कुकुंवाच्या वेळी.
 
सासरे माझी मायाळू ,
सासू माझी हौशी,
......रावांचे नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी
 
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
…चे नाव घ्यायला
उखाणा कशाला हवा.
फुलांची वेणी गुंफतो माळी,
......रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी
 
साड्या घातल्या आहेत,
सर्वानी छान,
......रावंच नाव घेते,
ठेवून सर्वांचा मान
 
भारत देश स्वतंत्र झाला,
१५ ऑगस्टच्या दिवशी,
......रावांचे नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी
 
पुरूष म्हणजे सागर,
स्त्री म्हणजे सरिता,
......रावाचं नाव घेते
तुम्हां सर्वांकरिता
 
आई ने केले संस्कार,
बाबांनी केले सक्षम,
......सोबत असताना,
संसाराचा पाया होईल भक्कम.
 
भाव तेथे शब्द,
शब्द तेथे कविता
......चे नाव घेते खास तुमच्या करिता
 
तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी,
......रावांचं नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी
 
कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात,
......चे नाव घेते
माझ्या मनात
 
गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी
......चं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या वेळी
 
वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस,कधी कधी पुनव कधी दिवस,
......रावांचे नाव घेते, आज आहेहळदी कुंकुवाचा दिवस
 
तुळजाभवानी मते वंदन करते तुला,
......रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला
 
हिरव्या हिरव्या रानात,
चरत होते हरण,
...... रावांचे नाव घेते,
हळदी कुंकाचे कारण
 
सर्व दागिन्यात,
श्रेष्ठ काळे मणी,
......राव आहेत
माझ्या कुंकवाचे धनी