ॐ यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात्।
आयुष्यमग्रं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः।।
उपनयन संस्काराच्या हार्दिक शुभेच्छा
उपनयन संस्कार या निमित्ताने
केसाच्या मुळाशी असलेले दोष जावेत
डोक्याच्या मध्यभागी असलेल्या बुद्धीचे रक्षण व्हावे
मेधा शाबूत रहावी यासाठी घेरा आणि शेंडीचे प्रयोजन
या महत्त्वाच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरो:।
बालो वेदाय तत् योगात् बालस्योपनयं विदु:॥
उपनयन संस्काराच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुगृही जाऊन बटू सुसंस्कारित होवो
अर्थात खूप शिकून आयुष्यात प्रगती करो
हीच सदिच्छा...
उपनयन संस्काराच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या वाटचालीकरिता
बटू तत्पर रहावा
यासाठीचा उपचार म्हणजेच मौंजीबंधन विधी
उपनयन संस्काराच्या हार्दिक शुभेच्छा
सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय
बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होणार्या या संस्काराच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा
परमात्मा बटूची बुद्धी व कर्म यांना सत्याकडे, सन्मार्गाकडे प्रवृत्त करत राहो अशी सदिच्छा
मुंज आणि त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...
उपनयन संस्कारामुळे व्यक्तीचे ज्ञान आणि कर्तव्यदक्षता वाढते
तसेच चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते
मुंजीच्या निमित्ताने पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा