रविवार, 13 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शनिवार, 12 एप्रिल 2025 (21:30 IST)

होणाऱ्या पालकांसाठी उपयोगी टिप्स जाणून घ्या

पालक होणे ही आयुष्यातील सर्वात सुंदर भावना आहे, परंतु त्यासोबतच, मुलाला जन्म देणे आणि पालक होणे हे एक जबाबदारीचे काम आहे. जर बाळाच्या जन्मापूर्वी पालकांना पूर्व तयारी करून घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना अडचणींना समोरी जावे लागणार नाही. मुलाच्या जन्माच्या आधी पालकांनी कोणती तयारी केली पाहिजे जाणून घ्या 
1 निरोगी जैवनशैलीचा अवलंब 
बाळाच्या जन्माच्या पूर्वी किंवा बाळाची तयारी करत असताना पालकांनी निरोगी जीवनशैली अवलंबवावी. दोघांनी संतुलित आहार घ्यावा. धूम्रपान, मद्यपान आणि जंकफूड सारख्या चुकीच्या सवयींपासून लांब राहा. नियमित व्यायाम करा.भरपूर झोप घ्या.
2 बाळाची काळजी घेण्याविषयी माहिती 
बाळाची योजना आखत आहात. बाळाला जन्म देण्यापूर्वी त्याच्या विषयी माहिती मिळवा. बाळाची झोप, स्वछता, स्तनपान इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्या. गर्भधारणा झाल्यावर वेळीच बाळाची आणि होणाऱ्या आईची नियमित तपासणी करा. डॉक्टरने दिलेल्या सूचनांचा पालन करा. 
 
3 भावनिक ओढ 
मुलाला जन्म देऊन एक महिला आई होते. तर पुरुष देखील वडील बनतात. दोघांच्या नात्याला बांधून ठेवणारा एक नवीन बंध त्यांच्याशी जोडला जातो. बाळाचे नाव काय ठेवावे. तपासणीला गेल्यावर त्याच्या हृदयाचे ठोके ऐका.त्याच्या संगोपनावर चर्चा करा. 
 
4 आर्थिक योजना आखा 
बाळाच्या जन्मानंतर खर्च वाढतो. त्यासाठी बजेट आखून ठेवा. आरोग्यविषयक विमा, वैद्यकीय आपत्कालीन निधी त्यासाठी तयार ठेवा. 
 
5 घर तयार करा 
बाळासाठी घरात सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण तयार करा. बाळाला राहण्यासाठी योग्य घर तयार करा. जेणेकरून त्याला आरामदायी वातावरण मिळेल. 
Edited By - Priya Dixit