शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (10:40 IST)

पावसाळ्यात बाहेर फिरत असाल तर नक्की वाचा, तुमचा मेकअप धुतला जाणार नाही

पावसाळ्यात लोक सहसा बाहेर जाण्यास नकार देतात.पण कधी-कधी सहलीवर जाण्याची पाळी आली की पावसाळा सर्वात अधिक पसंत केला जातो.अशा स्थितीत सहलीची योजना असल्यास मुली मेकअप करणार नाही असं तर होऊच शकत नाहीत.परंतु पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्यात भिजल्यावर संपूर्ण मेक-अप धुतला जातो. पण जर तुम्ही पावसात वॉटरप्रूफ मेकअप केलात तर तुमचा मेकअप बराच काळ टिकेल.चला तर मग जाणून घेऊया वॉटरप्रूफ मेकअप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत- 
 
मेकअपसाठी बेस तयार करा - होय, पावसात मेकअप करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या त्वचेवर बेस तयार करावा लागेल. यामुळे तुमच्या त्वचेवर मेकअप बराच काळ टिकून राहील. यासाठी 15 मिनिटांसाठी बर्फाने हलकासा चेहरा मसाज करा. मसाज केल्यानंतर, हलका हाताने चेहरा पुसून टाका.
 
मॅट आधारित उत्पादनांची निवड करा - रेनी सिझनमध्ये लिक्विड फाउंडेशन फार काळ टिकत नाही. पाणी लावताच त्वचा धुतली जाते. मॅटिफायिंग बेस किंवा पावडर वापरल्याने चेहऱ्यावर मेकअप संतुलित राहील. वास्तविक मॅट आधारित उत्पादने तुमच्या चेहऱ्यावरील तेल शोषून घेतात. यामुळे चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसतो.
 
मॅट आयशॅडो, आयलाइनर आणि काजल - फक्त पावसाळ्यातच मॅट मेकअप करा.जेणेकरून पाण्यात भिजल्यावर तुमचा मेकअप पसरु नये.तुम्ही हे देखील लक्षात घेतले असेल की, लिक्विड बेस्ड आयशॅडो,आयलाइनर आणि काजल लावताना ते पाण्याने पसरू लागतं आणि चेहर्‍यावर लांब काळ्या पाण्याच्या रेषा बनू लागतात.
 
मॅट लिपस्टिक - आपली आवड लिक्विड लिपस्टिक असली तरी पावसाळ्यात निघताना फक्त मॅट लिपस्टिक वापरा. बराच काळ लिपस्टिक टिकून राहील आणि पाणी लागल्यावरही पसरणार नाही.
 
मेकअप स्प्रे - तसं तर मेकअप स्प्रे जास्त वापरू नये.त्यात रसायने असतात जी डोळ्यांमध्ये येऊ शकतात. पण जर तुम्ही पावसाळ्यात बाहेर फिरायला जात असाल तर मेकअप लावल्यानंतर स्प्रे करा. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकेल.ओलावा, पाण्यात भिजणे किंवा घाम आला तरी मेकअप उतरणार नाही.