पुण्यातील आणखी एका टोळीवर मोक्काची कारवाई, येरवडा परिसरात दहशत पसरविण्याचा केला होता प्रयत्न

arrest
Last Modified शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (08:19 IST)
पुणे शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा

बडगा उचलला आहे.पुणे शहरातील
येरवडा परिसरामध्ये खुनी हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह 13 जणांव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे, अशितोष सुभाष अडागळे, शिवराज मनोज मिरगळ,तेजस हरीदास दनाने, विवेक उर्फ शुभम दुर्गेश सिंग, कुणाला उर्फ सोनबा संजय चांदने, संदीप सुग्रीव घोडेस्वार,रोहीत उर्फ विनायक प्रमोद भोंडे, दिपक दत्तु मदने, करण भारत सोनवणे,महेश सुनिल कांबळे, अजय युवराज कसबे, अनिकेत अनंत कसबे पाहिजे असलेला आरोपी महेश सरवदे असे मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे व त्याच्या साथिदारांनी आरोपींनी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 जुलै रोजी रात्री तीघांवर जीवघेणा हल्ला केला.

याच दरम्यान टोळीतील सदस्याने एकाला दगड मारुन हातातील मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला.तसेच परिसरात दहशत करण्याच्या उद्देशाने हातात तलवार, कोयते, पालघन व सिमेंट ब्लॉक घेऊन साक्षीदारांच्या घरावर मारुन, घरातील सामान फेकून दिले.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

आरोपी कसबे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींवर टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्तावयेरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांना पाठवला होता.त्याला मंजुरी देण्यात आली आहे.पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव हे करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.

शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 47 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्या चांदीचे नवे दर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात घसरण झाली. आज सलग ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला
आपल्या 16 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन प्रवास करणाऱ्या एका जोडप्याला सोलापूर, ...

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...