रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (08:52 IST)

प्राजक्ता माळी परदेशात जाण्यामागचं कारण

prajakta mali
प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. सध्या आपण लंडनला असल्याचं प्राजक्ताने फोटो पोस्ट करत सांगितलं होतं.
 
पण ती लंडनला का गेली? यामागचं कारण आता समोर आलं आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेबरोबर प्राजक्ता लंडनला गेली असल्याचं तिने सांगितलं. आता प्राजक्ताने एक नवी पोस्ट आणि फोटो शेअर करत परदेशात जाण्यामागचं कारण सांगितलं आहे. एका नव्या मराठी चित्रपटासाठी प्राजक्ताच्या नावाची वर्णी लागली आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनला पोहोचली आहे.
 
ती फोटो शेअर करत म्हणाली, “हो शुभारंभ हा शुभारंभ मंगल बेला आयी. लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु. जवळपास अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन चित्रपटांचं चित्रीकरण करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचा होता. ऋषिकेश जोशी, नितीन वैद्य सरांचे मनापासून आभार. पण यादरम्यान माझा कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहायला विसरु नका.”