Usha Nadkarni: मराठी चित्रपट ते हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय साकारणारी सुशांत सिंग राजपूतची ऑनस्क्रीन आई
टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा ताई नाडकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. यांचा जन्म 13 सप्टेंबर 1946 रोजी मुंबईत झाला. या अभिनेत्रीने मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'सिंहासन' या मराठी चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि मागे वळून पाहिले नाही, या अभिनेत्रीने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही भरपूर काम केले. 1987 मध्ये, अभिनेत्री तिच्या 'सडक छप' चित्रपटात एका अंध महिलेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. जिथे प्रेक्षकांनी त्यांचा अभिनयाला खूप पसंत केले. त्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळत राहिले.
1999 मध्ये त्यांनी चित्रपटांनंतर मालिकेत एंट्री घेतली. त्यानंतर लोक रोज त्यांच्या घरात अभिनेत्रीचे काम पाहू लागले. या अभिनेत्रीने मराठी प्रेक्षकांसाठी खूप काम केले आहे. चित्रपट असो किंवा मालिका, या अभिनेत्रीला आज बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार आणि दिग्दर्शक ओळखतात. उषा ताईंचे काम सर्वांनाच आवडले आहे. 'पवित्र रिश्ता'. या हिंदी मालिकेत अभिनेत्री सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेसोबत सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेत त्यांनी सविता देशमुखची भूमिका साकारली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्या कोलमडून गेल्या आणि म्हणाल्या की, “माझा मानव (सुशांत सिंग राजपूत) नेहमी माझ्या हृदयात असेल, त्याला माझ्या हृदयातून कोणीही काढू शकत नाही.
उषा ताई मराठीतील बिग बॉस 1 मध्ये सहभागी झाल्या होत्या. या घरात त्यांनी खूप दमदार खेळी खेळली. तिथे देखील त्यांनी आपल्या दमदार भूमिकेचा ठसा उमटवला. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले.उषा ताईंनी ने अभिनय विश्वात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी संजय दत्तच्या 'वास्तव' चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. जी अजरामर झाली.त्यांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली आहे. अभिनयासाठी सुंदर चेहऱ्याची किंवा मेकअपची गरज नसल्याचं त्यांनी आपल्या अभिनयातून सांगितलं आहे. अभिनयासाठी, आपल्याला फक्त एखादे पात्र कसे साकारायचे हे माहित असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा ताईं नाडकर्णी यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.