Varsha Usgaonkar: अभिनेत्री वर्षा उसगावकरांनी कोळी समाजाची माफी मागितली
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना कोळी समाजाच्या विरोधात बोलणे चांगलेच भोवले. त्यांना सध्या कोळी समाजाच्या रोषाला समोर जावे लागले आहे. याचे कारण असे की काही दिवसांपूर्वी वर्षा यांनी एक जाहिरात केली होती त्यामध्ये “बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले” असे विवादास्पद विधान केल्यामुळे कोळी बांधवांचा रोषाला त्यांना सामोरी जावे लागले आणि त्यांनी यावर संताप व्यक्त केला असून वर्षा उसगावकरांनी कोळी समाजाची माफी मागावी नाहीतर त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल. असे सांगण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी एक जाहिरात एका अॅपवर प्रसिद्ध झाली. या जाहिरातीत वर्षा उसगांवकर असून त्यांनी यामध्ये मासे खायला मला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत, बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.
त्यावर आता वर्षा उसगावकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत कोळी बांधवांची माफी मागितली आहे त्या म्हणाल्या, ऑनलाईन कंपनीकडून बनवण्यात आलेल्या जाहिरातीमुळे अनावधानाने माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी जाहीर पणे त्यांची माफी मागते. मला कोळी समाजाच्या प्रति आदर आहे माझा हेतू त्यांच्या भावना दुखावण्याचा न्हवता. मी सर्व कोळी बांधवांची हात जोडून माफी मागते. असे म्हणत कोळी महिलांची माफी मागितली आहे.