सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (08:50 IST)

अभिनेत्री वैदेही परशुरामी एक दोन तीन चार’या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली

jio cinema
‘जिओ स्टुडिओज’(jio studio)च्या ‘एक दोन तीन चार’या आगामी चित्रपटाची  घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट आपल्या भेटीला येणारं आहे. एक नाविन्यपूर्ण अशी जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे.
 
आणि महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे, ज्यांच्या बहुचर्चित ‘मुरांबा’ या चित्रपटानंतरचा हा पुढील चित्रपट असणार आहे. निपुण आणि वैदेही या कथानकातील जोडपं आयुष्याच्या अगदी तरूणाईच्या म्हणजे साधारण 23 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतं आणि मग या जोडप्याबरोबरच त्यांच्या जवळच्या मंडळींचीही सुरु होते तारेवरची कसरत या सर्व प्रवासात नक्की काय-काय घडणार हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहणं उत्सुकतेच असणारं आहे.