शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2020 (14:48 IST)

मानधनाच्या बाबतीत तरडे मराठीतील सुपरस्टार

मानधनाच्या बाबतीत प्रवीण तरडेच मराठीतला सुपरस्टार आहे अशी माहिती समोर आली आहे. तरडे हे एका सिनोसाठी 50 लाखांचं मानधन घेतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिनेता स्वप्निल जोशी चित्रपटासाठी 45 ते 50 लाख मानधन घेतो, सई ताम्हणकर 20 ते 25 लाखांचं मानधन घेते अशी माहिती समोर आली होती. अंकुश चौधरी 25 लाख मानधन घेतो. 
 
सोनाली कुलकर्णी 15 ते 19 लाखांच्या घरात मानधन घेते. उमेश कामत 10 लाख रुपये मानधन घेतो. अमृता खानविलकर 10 ते 15 लाख रुपये मानधन घेते. प्रिया बापट 8 ते 10 लाख मानधन घेते. तर सुबोध भावे 15 ते 20 लाखांचे मानधन घेतो. मात्र या सगळ्यांमध्ये तरडे जास्त मानधन घेतात. त्यांनीच मुळशी पॅटर्न या सिनमेची कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन हे केलं आहे.