1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 21 डिसेंबर 2022 (16:20 IST)

ओ अंतवा नंतर रागिणीचे मराठी 'श्रीवल्ली' वायरल Video

shrivalli marathi
पुष्पा या ब्लॉकबस्टर दाक्षिणात्य सिनेमातील गाणी आज ही मोठ्या प्रमाणात पसंतीस पडत आहे. शिवाय या गाण्याचे विविध भाषांमध्ये व्हर्जंन पाहायला मिळाले आहेत. पण, गायिका रागिणी कवठेकर च्या आवाजातील श्रीवल्ली हे गाणं इतरांपेक्षा जरा उजवं ठरल आहे. याच कारण म्हणजे, हे गाणं पुष्पा सिनेमातील गाण्याची अधिकृत म्युजिक कंपनी आदित्य म्युजिक ने खास मराठीमध्ये सादर केलं आहे. रागिणी कवठेकरच्या ओ अंतवा या मराठी फिमेल व्हर्जन गाण्याची प्रसिद्धी पाहता, श्रीवल्ली देखील प्रसिद्धीचा उच्चांक गाठेल यात शंका नाही.
खरे तर श्रीवल्लीसाठी असलेलं हे गाणं, मराठीमध्ये खुद्द श्रीवल्लीच आपल्या पुष्पासाठी गात आहे, असे दिसून येते. या गाण्याचे शब्दांकन शशांक कोंडविलकर यांनी केलं असून, साऊथ सिनेमातील सुपरहिट गाण्यांसाठी प्रचलित असलेल्या आदित्य म्युजिक यु ट्यूब चॅनलवर हे गाणं अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
Published By -Smita Joshi