मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा विवाहबंधनात
Instagram
2013 साली रणजितने संयुक्ता सोबत पहिले लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच काही व्यक्तिगत कारणामुळे त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री प्रणाली धुमाळ सोबत रणजितचे हे दुसरे लग्न आहे.
रणजित च्या लग्नाची बातमी समजताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रणजित जोगचे कुटुंब चार पिढ्यांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रणजितचे वडील संजय जोग हे मराठी हिंदी सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. नाना जोग हे रणजितचे पणजोबा हे मराठी सृष्टीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जात. संजय जोग यांनी 1995 साली किडनी विकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे. रणजितची आई नीता जोग या पेशाने वकील आहेत.
