सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (15:08 IST)

'अण्णा नाईक' परत येणार, पुढील महिन्यात पुन्हा या मालिकेची वाटचाल सुरू

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटी येत आहे. या मालिकेचं लवकरच शूट सुरू होऊन पुढील महिन्यात प्रेक्षकांना आपली आवडती मालिका बघायला मिळणार आहे. मालिका पुन्हा एकदा पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले असून प्रेक्षक 'अण्णा नाईक', 'माई', 'शेवंता' या आपल्या आवडत्या पात्रांची वाट बघत आहेत. 
 
लॉकडाऊनमुळं शूट बंद असल्यानं 'रात्रीस खेळ चाले' सध्या प्रसारीत होत नव्हती. मालिकेच्या नवीन भागांसाठी लवकरच शूटिंग सुरु होईल अशाने लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 
 
मागील दोन्ही पर्वात अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. तर तिसऱ्या पर्वातील गोष्ट काही वर्षांनंतरची आहे. त्यामुळे लोकांना उत्सुकता लागून राहीली आहे की पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. मालिकेच्या दुसऱ्या भागात अण्णा नाईक यांचं निधन झाल्याचं दाखवलं आहे. आता तिसऱ्या भागात नेमकं अण्णा नाईक यांना कोणत्या भूमिकेत दाखवणार हे पाहण्याची प्रेक्षकांच्या मनता फार उत्सुकता आहे.
 
मालिकेच्या नवीन भागांच्या प्रसारणाबद्दल बोलताना टीमने सांगितलं की रात्रीस खेळ चाले हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची इच्छा आहे. कथानक अधिकाधीक गूढ होत जाईल कारण अण्णा आणि शेवंता आता भूताच्या रुपात नेमकं काय करणार आहेत? वाड्याचं काय होणार? या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत.