पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या (पिफ) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

piff
Last Modified मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (07:53 IST)
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 4 ते 11 मार्च दरम्यान होणा-या 19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या (पिफ) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यावर्षी चित्रपटगृहा बरोबरच ऑनलाईन माध्यमातून महोत्सव पार पडणार असून या दोन्हींसाठी नोंदणी प्रक्रिया ही वेगवेगळी असणार असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने कळवण्यात आली आहे.
महोत्सवाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन मंगळवार (दि.16) तर, गुरुवार (दि.25) पासून स्पॉट रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीचे शुल्क हे सर्वांसाठी 500 रुपये इतके असेल, यामध्ये निवडक 26 चित्रपट दाखविले जाणार आहेत. याबरोबरच चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी नोंदणी शुल्क हे सर्वांसाठी 600 रुपये इतके असणार असून यामध्ये 150 चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

यावर्षी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या 3 ठिकाणी 7 स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहिती देखील फाउंडेशनने कळविली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे //www.piffindia.com या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 16 फेब्रुवारी पासून उपलब्ध असणार आहे. तर 25 फेब्रुवारी पासून सुरू होणारे स्पॉट रजिस्ट्रेशन हे पीव्हीआर (सेनापती बापट रस्ता), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लॉ कॉलेज रस्ता) आणि आयनॉक्स (कॅम्प) या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 पर्यंत असेल. दोन्ही रजिस्ट्रेशन पद्धतीसाठी मर्यादित जागा उपलब्ध असून चित्रपट प्रेमींनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना काळात सरकारने लागू केलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन हे चित्रपटगृहात करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Radhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने ...

Radhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने पहिल्याच दिवशी रिकॉर्ड केला
यंदाच्या ईदच्या निमित्ताने सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांना एक खास भेट ...

कोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'

कोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'
१३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी ...

देशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर

देशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर
देशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...

तेथे मोजकेच बोलतात

तेथे मोजकेच बोलतात
एक माणूस वॅक्सीन घ्यायला जातो, खूप बडबड करत असतो... "डॉक्टर, दुखेल का?

प्रतिमा निर्मितीपेक्षा यात आणखी बरेच काही ...

प्रतिमा निर्मितीपेक्षा यात आणखी बरेच काही आहे....कोरोनाबद्दल अनुपम खेर यांनी केली मोदी सरकारवर टीका
भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या प्रादुर्भावामुळे खळबळ उडाली आहे. ऑक्सिजनच्या ...