बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (16:18 IST)

रोझ डे च्या माध्यमातून कॅन्सरसाठी जनजागृती

गेली ४७ वर्षे सुरू असलेली कर्करोगासंबंधीची सीपीएएची मोहीम आता अधिकच तीव्र झाली आहे, हे नुकताच दिसून आले. रोझ डे च्या निमित्ताने ‘कॅन्सर पेशंट्स अ‍ॅड असोसिएशन’ (सीपीएए) च्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीपीएएने कोरिओग्राफर शामक दावर सोबत डान्स व एंटरटेनमेंटने परिपूर्ण असा एक जल्लोष कार्यक्रम साजरा केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात शामकच्या काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स देत कॅन्सर रूग्णांना आयुष्याशी लढण्यासाठीची उमेद दिली. तसेच कॅन्सरविषयी जनजागृतीही करण्यात आली. 
 
शामकच्या आईदेखील ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्ण होत्या. त्यामुळेच याचा परिणाम आयुष्यावर कसा होतो व किती त्रासदायक आजार असतो हे मी जवळून पाहिले आहे. तसेच या आजाराशी लढण्यासाठी केवळ हिंमत, योग्य उपचार व आपल्या परिवाराची साथ असणे गरजेचे आहे असे यावेळी शामकने आवर्जून सांगितले. डान्स हीदेखील एक प्रकारची उपचारपद्धती आहे. तेव्हा आम्ही केलेल्या परफॉर्मन्सला उपस्थित रूग्णांनी देखील खुप वाव दिला असेही शामकने यावेळी सांगतिले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या धर्मशाळा व रूग्णालयातील जवळपास 650 रूग्ण व त्यांचे नातेवाईक सहभागी झाले होते अशी माहिती सीपीएएचे चेअरमन वाय. के. सप्रू यांनी दिली.