सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

लाल रंग करेल कर्करोगावर मात

लाल रंग धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक असून आरोग्यासाठीही आपल्या रंगाप्रमाणेच फायदेशीर आहेत. लाल रंगाच्या फळांमध्ये लायकोपीन आणि अँथ्रेसीन असतं ज्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. या रंगाचे फळ स्मृती सुधारण्यास मदत करतात.
 
हे शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात, ज्याने आपण ताजेतवाने दिसतात. म्हणूनच आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट, कॅप्सकम, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, चेरी, प्लम फळं व इतर सामील करावे.
 
पांढरा रंगही फायदेशीर
पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात सामील केल्यानेदेखील कर्करोगाची आणि ट्यूमरची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त हे चरबी कमी करण्यात उपयुक्त असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतात. 
 
पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये अलिसिन आणि फ्लेव्होनॉइड भरपूर प्रमाणात आढळतं. म्हणूनच आपल्या आहारात केळी, मुळा, बटाटा, कांदा, नारळ, मशरूम व इतर पदार्थांचा समावेश करू शकता.