गुलाब शेवया खीर रेसिपी
साहित्य-
तीन कप फुल क्रीम दूध
अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क
तीन टेबलस्पून गुलाब सिरप
अर्धा टेबलस्पून तूप
एक कप तांदळाच्या शेवया
वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
काजू
बदाम
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात शेवया घाला. शेवया सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या. आता त्या एका प्लेटमध्ये काढा. आता पॅनमध्ये सुका मेवा घाला आणि त्याच तुपात परतवून घ्या. मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यात दूध घाला, दूध उकळी आणा आणि ढवळत राहा. दूध कमी होऊ लागले की त्यात कंडेन्स्ड मिल्क, वेलची पूड, केशराचे तुकडे घाला. आता आच कमी करा आणि त्यात शेवया, सुके मेवे, बदाम, काजू, गुलाबाच्या पाकळ्या घाला. झाकण ठेवून ४-५ मिनिटे शिजवा. आता खीर थंड होऊ द्या आणि थंडगार सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik