पोषकतत्वांनी भरपूर बीटाची खीर रेसिपी  
					
										
                                       
                  
                  				  पोषकतत्वांनी भरपूर असलेले बीट हे शरीरातील रक्ताची कमी दूर करते. तसेच तुम्हाला माहित आहे का? बीटापासून गोड अशी खीर देखील बनवता येते. तर चला जाणून घ्या बीटाची खीर रेसिपी 
				  													
						
																							
									  
	 
	साहित्य-
	एक बीट (किसलेले)
	दोन कप दूध
	वेलची पूड 
	दूध मसाला
	 
				  				  
	कृती- 
	बीटाची खीर बनवण्यासाठी बीट स्वच्छ धुवून किसून घ्यावा. आता एका पातेलीत दूध घालून उकळण्यास ठेवावे. तसेच एका दुसऱ्या पॅनमध्ये किसलेले बीट परतवून घ्यावे. तसेच चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर ते उकळलेल्या दुधात घालावे आणि 10 मिनिटे शिजवावे. शिजल्यानंतर त्यात वेलची पूड आणि दूध मसाला  घालून थोडावेळ चमच्याने ढवळावे. आता एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये ड्रायफूट घालावे. तर चला तयार आहे आपली बीटाची खीर, गरम सर्व्ह करू शकतात. 
	
		अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
							
 
							
						
						 
																	
									  
		 
		Edited By- Dhanashri Naik