1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. Delicious Banana Halwa Recipe

रुचकर केळीचा हलवा रेसिपी

Delicious Banana Halwa Recipe
साहित्य-
केळी 4 पिकलेली  
तूप 2 चमचे
साखर 1/2 कप  
दूध 1/2 कप
काजू 10 ते 12  
बदाम 10 ते 12  
मनुका 2 चमचे
वेलची पूड 1/2 चमचा 
नारळ 1/4 कप किसलेले 
सजावटीसाठी पिस्ता आणि चारोळी 
 
कृती-
केळीचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये केळाचे साल काढून ते मॅश करून घ्यावे.केळे जेवढे पिकलेले असतील तेवढा हलवा रुचकर होईल. आता एका मोठ्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घालावे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू, बादाम आणि मनुका घालाव्या. तसेच हे परतवून घ्यावे.
 
आता यामध्ये मॅश केलेले केळे घालावे व मिक्स करावे. यामुळे चव रुचकर लागेल. आता यामध्ये साखर घालावी. साखर विरघळल्यानंतर दूध घालावे. तसेच आता हलव्यामध्ये यानंतर वेलची पूड आणि किसलेले नारळ घालावे. नारळाचा किस हलव्याची चव वाढवेल.
 
हा हलवा मध्यम गॅस वर ठेऊन हलवत राहावा. जेव्हा हलवा तूप सोडायला लागेल तेव्हा गॅस वरून खाली काढून ठेवा. तयार हलवा बाऊलमध्ये काढून त्यावर पिस्ता, चारोळी, सुकामेवा घालून सजवा. तर चला तयार आहे आपला केळीचा हलवा. थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
पोटाला थंडावा देते दुधीचे आरोग्यवर्धक ज्यूस