रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (07:50 IST)

गणपती बाप्पासाठी नैवेद्यात बनवा बेसनाचे मोदक

Modak
दहा दिवसांचा गणपतीबाप्पाचा उत्सव सुरु झाला आहे. गणपतीला  मोदक आवडतात आणि गणेशोत्सवात त्यांना विविध प्रकारचे मोदक नैवेद्यात अर्पण केले जातात. तुम्हालाही घरगुती मोदक अर्पण करून गणपतीला प्रसन्न करायचे असेल तर आज आपण बेसनपासून बनवलेल्या मोदकांची  रेसिपी पाहणार आहोत, तर चला जाणून घ्या बेसनाचे मोदक कसे बनवावे.  
 
साहित्य-
2 वाट्या बेसन 
1 वाटी तूप  
1 कप पिठी साखर  
अर्धा चमचा वेलची पूड  
10 केशर धागे  
 
कृती-
एका कढईमध्ये तूप गरम करून घयावे. मग त्यामध्ये बेसन घालून मंद आचेवर चांगले परतून घयावे. बेसनचा सोनेरी रंग झाल्यावर दुसऱ्या भांड्यात काढावे. व थंड करून त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालावी. सर्व साहित्य मिक्स करून मिश्रण तयार करावे. तयार मिश्रण ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यात ओतून मोदक तयार करा. जर तुमच्याकडे साचा नसेल तर या मिश्रणाला हाताने मोदकांचा आकार द्या आणि तयार केलेला मोदक गणपतीला नैवेद्यासाठी ठेवा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik