सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जाणून घ्या साबुदाणा खाण्याचे हे फायदे...

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते.  
 
ऍनिमियाला ठेवते दूर
 
साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे रेड ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.
 
उच्च रक्तदाब ठिक करते
 
याच्या सेवनाने रक्ताभिसरण चांगले होते. जेणेकरुन धमन्याचे कार्य सुरळित होते आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.
 
ऊर्जा मिळते
 
साबुदाणा ब्रेकफास्टमध्ये खाण्यामुळे तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतात. दिवसभर काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते.
 
मासपेशीत वाढ
 
साबुदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते. यामुळे मासपेशी मजबूत होतात तसेच त्याची वाढही होते.
 
हाडे मजबूत
 
यामध्ये व्हिटामिन के आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.