शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जास्त मीठ खाल्लयाने होऊ शकतो डायबिटिज

लंडन- मधुमेहापासून आपल्याला दूर ठेवायचे असेल तर केवळ साखर खाणे सोडून चालणार नाही. कारण, नुकत्याच करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनानुसार जास्त मीठ खाणेही बनू शकते मधुमेहाचे कारण.
 
संशोधकांच्या मते जास्त मीठ म्हणजे सोडियम खाल्ल्याने उक्त रक्तदाबाची समस्या निर्माण होते. मात्र, आता नव्या संशोधनामुळे जास्त मीठ खाणे हे कारण मधुमेह हा आजार होण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. लिस्बनमध्ये आयोजित युरोप 
 
असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटिजच्या वार्षिक बैठकीत यासंबंधी माहिती देण्यात आली. 
 
जे लोक दिवसभरात 2.5 ग्रॅमपेक्षाही जास्त मीठ खातात त्यांना टाईप 2 डायबिटिजचा धोका 43 टक्क्यांहून अधिक असतो. तसेच शरीराच्या आवश्यकतेपेक्षा 7.3 ग्रॅम जास्त मीठ खात असाल, तर टाईप 2 डायबिटिजचा धोका वाढून तो 72 टक्क्यांवर पोहोचतो.