1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

कावीळ, कर्करोगाचे निदान चक्क सेल्फीने

IT news
सध्या सल्फीचे खूळ जगाच्या डोक्यावर बसले असले तरी त्याचा काही चांगल्या कामासाठीही वापर करता येऊ शकतो. सेल्फीच्या मदतीने चक्क स्वादुपिंडाचा कर्करोग, कावीळ किंवा इतर रोगांचे निदान करता येते, असा दावा करण्यात संशोधकांनी केला असून, त्यासाठी एक अॅपही विकसित करण्यात आले आहे.
 
स्वादुपिंडाचा कर्करोग व कावीळ यात त्वेचचा रंग पिवळा होणे, डोळे पिवळे पडणे ही प्रमुख लक्षणे असतात. ती रक्तातील बिलीरूबीनमुळे दिसतात. नुसत्या डोळ्यांना त्वचेचा रंग पिवळा झालेला आधक्षच्या टप्प्यात कळत नाही, पण या अॅपमुळे स्वछायाचित्रावरून अर्थातच सेल्फीने कावील ओळखता येते. बिलीरूबीनची पातळी थोडी वाढलेली असतानाच हे शक्य होते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी बिलीस्क्रीन अ‍ॅप तयार केले असून त्यात स्मार्टफोन कॅमेरा, संगणक दृष्टी अलगॉरिथम, मशीन लर्निग साधने यांचा समावेश आहे.
 
डोळ्याचा पांढरा भाग काविळीत पिवळा पडतो आणि सेल्फीत पटकन कळून येतं. तसेच स्वादुपिंडाचा कर्करोगही भयानक असतो. या कर्करोगातही रक्ताच्या चाचणीच्या तुलनेत 89.7 टक्के रूग्णात सेल्फी अचून निदान करता आल्याचा दावा केला गेला आहे.