शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (16:23 IST)

सई ताम्हणकर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या चाहत्यांच्या मनावर राज करत असते. नुकताच तिचा ‘मीमी’ हा बॉलिवूड चित्रफट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामुळे सई खूप चर्चेत आली आहे. चित्रपटामधील तिच्या कामाचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे. 
 
सोशल मीडियावर सईच्या कामाचे कौतुक करताना सहकलाकार आणि चाहते थकत नाही आहेत पण सईचा प्रवास केवळ बॉलिवूड पुरता मर्यादित न राहता आता साऊथ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. सई आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ वेबसीरिज मध्ये दिसणार आहे. 
 
नेटफ्लिक्सवर ही तमिळ वेबसीरिज दिसणार आहे. दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपती सोबत ती झळकणार आहे. सईने तिच्या सोशल मीडिटावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिने विजयसोबत फोटो पोस्ट केला आहे. तर त्यावरील कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तमिळ भाषेत तिने हे कॅप्शन लिहिले आहे.