शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (15:44 IST)

संगीतकार सलीम-सुलेमान मराठीत

salim suleman
संगीतकार सलीम-सुलेमान ही जोडीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ चित्रपटाच्या निमित्ताने सलीम–सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. या गाण्याचं रेकोर्डिंग नुकतंच संपन्न झाले आहे.
 
‘मराठी चित्रपटसृष्टीतील हा आमचा पहिलाच अनुभव होता. विशेष म्हणजे हा अनुभव खूपच वेगळा होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे’, असं सलीम- सुलेमानने सांगितलं.