गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 19 जून 2019 (09:55 IST)

संजय दत्तचा ‘बाबा’ २ ऑगस्टला प्रदर्शित होणार

संजय दत्त आणि मान्यता दत्त ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एक कुटूंब घरावर येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून, कसे एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे. चित्रपटात दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत आहेत. त्याचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.