सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (11:41 IST)

Seema Deo ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

Seema Deo Passes Away
Seema Deo Passes Away मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी होत्या. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
 
2020 मध्ये त्यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासले असल्याची माहिती अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्वीट करुन दिली होती. सीम देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. 
 
सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते. सीमा देव यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले. मुंबईतील गिरगाव येथे जन्माला आलेल्या सीमा देव यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झाले. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत.
 
2017 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.