सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (10:18 IST)

सईचा चाहत्यांना धक्का देणारा निर्णय!

मराठी सिनेसृष्टीतील हॉट आणि ग्लॅमर अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सई ताम्हणकरने एक महत्त्वपूर्ण निर्णय  घेतला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. आयुष्यात घडणार्‍या घडामोडी सोशल मीडियाच्या मध्यमातून आपल्या चाहत्यांमसोर मांडणारी सई आता सोशल मीडियापासून पूर्णपणे अलिप्त राहणार आहे. याबाबत सई सांगते की, मी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते आणि माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला मला खूप आवडतो. पण सध्या कामानिमित्त वाढलेल्या धावपळीमुळे मी काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे मी स्वतःला वेळ देऊ शकते, त्यातूनच मला स्वतःमध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे असल्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय मी घेतला आहे. सई ताम्हणकरचे इन्स्टाग्रामवर साडेनऊ लाखांपेक्षा जास्त, ट्विटरवर 79 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर फेसबुकवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अशावेळेस सईने अचानक सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याचे ठरवले आहे.