शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (15:54 IST)

Sonali Kulkarni सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज ?

sonali kulkarni
लॉकडाऊनमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मागील वर्षी सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. आता नुकतीच सोनाली कुलकर्णीने 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये एक गुडन्यूज दिली आहे. सोनाली कोणालातरी फोन करून 'आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे' असं सांगत आहे. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. आता ही गुडन्यूज काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना येत्या शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागेल.
sonali kulkarni

यावेळी सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले. सोनाली कुलकर्णी आणि तिच्यामध्ये लोकांचा कसा गोंधळ व्हायचा, याचाही धमाल किस्सा तिने यावेळी सांगितला. तिच्या आवाजावरून तिला अनेकदा नाकारण्यात आले, हेसुद्धा तिने यावेळी सांगितले. हा एपिसोड प्रेक्षकांना शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.
 
Published By -Smita Joshi