सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

वडिलांच्या स्मरणार्थ तिघा भावंडांनी समाजाला दिला नवा आदर्श

bench
मंगळग्रह मंदिराला दिले बाक भेट
 
अमळनेर : जि.जळगाव (महाराष्ट्र) येथील मंगळग्रह मंदिराला अमळनेर तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद शाळेची सेवानिवृत्त मुख्याध्यापक अप्पासाहेब वंजी श्रावण वाणी यांच्या पुण्यस्मरणार्थ तिघं भावंडांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बाक भेट दिला.
 
मुख्याध्यापक वंजी वाणी (वाणी गुरुजी) यांचे २०२० मध्ये निधन झाले. वाणी गुरुजी यांचा शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाला. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज उच्च पदापर्यत पोहोचले आहेत. वडिलांच्या आठवणीला उजाळा देत विजय, संजय व मुलगी सुनंदा वाणी या तिघा भावंडांनी अनावश्यक खर्च टाळून वडिलांच्या आठवणी चिरंतर राहावे, यासाठी मंगळ ग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी बाक उपलब्ध करून दिले आहे. बुधवारी मंगळ ग्रह संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सोपविण्यात आले. यावेळी हेमंत गुजराती उमाकांत शेटे आदी उपस्थित होते.