मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 मार्च 2018 (11:24 IST)

सुबोध-श्रुती पुन्हा झळकणार

'बंध नायलॉनचे' मधून लोकांच्या पसंतीस पडलेली सुपरहिट जोडी सुबोध भावे आणि श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हि जोडी तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत आहे. तूर्तास या सिनेमाचे नाव ठरले नसले तरी, फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन्स निर्मित या सिनेमाचे समीर रमेश सुर्वे दिग्दर्शक असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
सुबोध - श्रुती या जोडीचा चाहतावर्गदेखील मोठा असल्यामुळे, त्यांच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असणार हे निश्चित !