रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (13:23 IST)

‘बबड्या’साठी शुभ्राची खास पोस्ट, फोटो चर्चेत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘अग्गंबाई सासूबाई’ ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील बबड्या आणि शुभ्रा ही जोडी घराघरात पोहचली होती. त्यांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम देखील मिळाले होते. मात्र आता ही जोडी रिल नव्हे तर रियल लाइफमुळे चर्चेत आली आहे.
 
या मालिकेत बबड्याच्या भूमिकेत अभिनेता आशुतोष पत्की तर शुभ्रा ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी ही जोडी चर्चेत आली आहे एका स्पेशल पोस्टमुळे. तेजश्रीने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
 
तेजश्री प्रधानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आशुतोषसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की ‘काम, क्राईम पार्टनर, क्रिएटिव्हीटी, फाईट, लाफ्टर, गॉसिप अशा प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत सहभागी होणाऱ्या माझ्या पार्टनरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’. तेजश्रीच्या या पोस्टनंतर आशुतोषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by