मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:46 IST)

सोनाली पाटील 'बिग बॉस'मधून बाहेर

टिकटॉक स्टार सोनाली पाटील बीग बॉसमधून बाहेर पडली आहे. रविवारी (19 डिसेंबर) सोनालीने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला.
विशाल निकम, विकास पाटील, मीरा जगन्नाथ,मीनल शाह, जय दुधाणे,उत्कर्ष शिंदे आणि सोनाली पाटील या सात जणांमधून कोण एलिमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष होतं. आता अभिनेत्री आणि टिकटॉकस्टार सोनाली पाटील बाहेर पडली आहे.
सोनाली पाटील मुळची कोल्हापूरची असून टिकटॉकच्या माध्यमातून सोनालीचा चाहता वर्ग निर्माण झाला. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. वैजू नंबर वन या मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
 
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचे ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. विजेत्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता बिग बॉस मराठीत एकूण 6 स्पर्धक बाकी आहेत.