सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (15:45 IST)

'माझा होशील ना ' या मालिकेतील अभिनेत्रीला 'या ' कारणावरून मंदिरात प्रवेश दिला नाही

माझा होशील ना मालिकेतील अभिनेत्री मुग्धा पुराणिक हिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या मध्ये तिच्या सोबत जे काही घडले आहे ते शेअर केले आहे. तिने या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे की , आज मी आपला एक कटू अनुभव शेअर करत आहे. आपण असं समजतो की आपले सर्वधर्म समान आहे. पण मला जो काही अनुभव आला आहे. त्यावरून मला धक्काच बसला आहे. मी आणि माझी मैत्रीण कल्याणजवळ एका जैन मानस मंदिरात गेले असताना तिथल्या लोकांनी डोक्यावर घेण्यासाठी ओढण्या दिल्या नंतर आत गेल्यावर रांगेत उभे असताना जैन समाजातील काही लोकांनी आम्हाला तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकत नाही. असे म्हणाले यावर मी त्यांना विचारले की आम्ही का जाऊ शकत नाही त्यावर ते म्हणाले की तुम्ही जैन धर्माचे नाही. त्यांचे असे  बोलणे मला खटकले कारण आपल्या हिंदू धर्माच्या देवळात कोणत्याही धर्माच्या लोकांना येण्याची परवानगी आहे. पण आजचा अनुभव खूप वेदना देणारा होता. या वरून आपण 21 व्या शतकात राहणारे आज देखील आपल्या समाजात जातीपातीचा बंधन आहेच हे बघून आश्चर्य वाटते. मुग्धा म्हणाली की आज जे अनुभव मला मिळाले आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे असे मला वाटते.'