1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (17:25 IST)

ठिपक्यांची रांगोळी फेम या अभिनेत्रीने लावले आपल्या आईचे दुसरे लग्न

thipakayanchi rangoli
सिद्धार्थ चांदेकर नंतर आता अभिनेत्री अमृता फडके हिने आपल्या आईचे स्मिता फडके यांचं दुसरं लग्न लावून दिले. अमृताची आई स्मिता फडके या सिने सृष्टीत एडिटिंग आणि कलरिस्ट आहे. त्यांनी शिरीष केळकर यांच्याशी लग्न केलं. शिरीष हे सीए असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

अमृताने फेसबुकवर पोस्ट शेअर करून आईला शुभेच्छा दिल्या असून तिने आईच्या लग्नाचा फोटो देखील शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. तिने आईला अभिनंदन केले आहे. ती लिहिते आई अभिनंदन तुला तुझ्या पुढील नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा .प्रत्येकाला चांगला जीवनसाठी मिळावा असं वाटत. पण सगळ्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. सुदैवाने तुला असा जोडीदार मिळाला  आहे. आणि तोही तुझ्या दुसऱ्या इनींग मध्ये!

अनेक वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारण्याची आणि ती रिकामी जागा भरण्याची मनापासून इच्छा होती. पण हे करणं माझ्यासाठी सोपं नह्व्त पण तू ती जागा भरून काढली हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. या नात्यातून मला भाऊ बहीण देखील मिळाले आहे. मला खूप छान वाटत आहे. तुला मनापासून धन्यवाद! असं अमृताने आईसाठी लिहिले आहे. 

अमृताच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत मानसीची भूमिका साकारली होती.  

Edited by - Priya Dixit