लग्नातील एन्ट्रीचा स्टंट जीवाशी आला, वधू बचावली
सध्या सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ हादरवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सध्या लग्नात काही हटके करण्याचा ट्रेंड सुरु आहे. वर वधू काही वेगळ्या पद्धतीने लग्नमंडपात एंट्री करतात. या साठी ते वेगवेगळे स्टंट करतात.अनेकदा हे स्टंट धोकादायक देखील असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .या व्हिडीओ मध्ये वर आणि वधू हे स्पार्कल गन घेऊन पोझ देत आहे. नंतर ते त्यामधून फायर करतात. मात्र पुढे जे काही झालं ते खूपच धक्कादायक आहे.
आधी वर त्या गन मधून फायर करतो नंतर वधू ने गन फायर केल्यावर काही वेळातच वधूच्या चेहऱ्याला आगीने पेटतो. तातडीनं आग विझवण्यात येते. आणि वधूचा चेहरा पूर्णपणे काळा होतो. वधू घाबरते आणि हातातली गन लांब फेकते.
हा संपूर्ण प्रकार तिथे असलेल्या पाहुण्यांपैकी कोणीतरी सोशलमिडीयावर शेअर केला असून हा वेगानं व्हायरल झाला आहे. या वर लोकांनी प्रतिक्रिया देत वधूसाठी खूपच वाईट झालं असे कॉमेंट्स केले आहे.
Edited by - Priya Dixit