शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (13:02 IST)

धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीचा खून केला, आरोपीला अटक

murder
दारू माणसाला बरबाद करते असं म्हणतात. मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथे पत्नी दारूला पैसे देत नाही या कारणावरून एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला कायमचे संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोईनुद्दीन अन्सारी असे या आरोपी पतीचं नाव आहे. तर परवीन अन्सारी असे मयत महिलेचे नाव आहे. 
 
आरोपी मोईनुद्दीन याला दारूचे व्यसन होते. दारूवरून त्याचे त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद व्हायचे. गुरुवारी दारू पिण्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि विकोपाला जाऊन त्याने पत्नीला मारहाण केली. या प्रकरणात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घडलेल्या या प्रकारानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असून आरोपी मोईनुद्दीन अन्सारीला रेल्वे पोलिसांनी मालाडच्या मालवणी येथून त्याला अटक केली. 

Edited by - Priya Dixit