Indapur : गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकी विरोधात ओबीसी समाजा कडून बंदची हाक
इंदापूरात एल्गार मेळाव्याचे आयोजन होते.या मेळाव्यात भाजपचे आमदार गोविंद पडळकर व छगन भुजबळ हे उपस्थित होते. या वेळी पडळकर यांनी सभेत भाषण केलं. आणि त्यात मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलनावर रोखठोक भाषण केलं. जवळच शेजारी मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण सुरु होते. सभा झाल्यावर दूध आंदोलकांना भेटण्यासाठी निघालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना मराठा आंदोलकांनी अडवून त्यांच्यावर चप्पलफेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकारानंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरला असून रास्ता रोको करण्यात आले आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दोषींवर कारवाई न केल्यास रविवार 10 डिसेंबर रोजी इंदापूर बंद ठेवण्याची मागणी होत आहे.
या वर तीव्र निषेध करत छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट केले. त्यांनी म्हटले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ उपस्थित होते.आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला!
आज विधानपरिषद सदस्य श्री.गोपीचंदजी पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली! या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो! मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितल आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!
Edited by - Priya Dixit