सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (08:06 IST)

अजित पवार हे लबाड लांडग्याचे लबाड पिल्लु- गोपीचंद पडळकर

gopichand padalkar
अजित पवार हे लबाड लांडग्याचे लबाड पिल्लु असून आम्ही त्यांनी मानत नाही. तसेच शरद पवार यांच्यासारखे 500 लोक भाजपात ते कोणत्या कोपऱ्या त बसतील हे सांगता येणार नाही. तसेच 2029 नंतर राष्ट्रवाजी काँग्रेस पार्टी पक्ष शिल्लक राहणार नाही अशी जळजळीत टिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि शरद पवारांवर केली आहे. त्यांच्या या टिकेने महाराष्ट्रातील राजकिय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
काही दिवसापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली होती. ते म्हणाले, कि राजकीय दृष्टीकोणातून शरद पवार पवार भाजपाचे बाप असून त्यांचे कुटुंब आणि पक्ष फोडण्यासाठी भाजपा जबाबदार आहे. असा आरोप त्यांनी केला होता.
 
रोहित पवारांच्या या टिकेला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर देताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “रोहित पवारांना माहिती नाही की, शरद पवार यांच्यासारखे 500 लोक भाजपात आहेत. शरद पवार कोणत्या कोपऱ्यात बसतील हे त्यांना सुद्धा कळणार नाही. महाराष्ट्रात काही चालत नसल्याने रोहित पवार काहीही बोलून लोकांना भावनिक करण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग असून 2024 सालीपर्यंतच हे दिसणार आहेत. 2029 मध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि यांचे नेते दिसणार नाहीत.” असा भाकित त्यांनी केले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor