Gram Panchayat Election :पराभूत उमेदवाराकडून हवेत गोळीबार, गुन्हा दाखल
वालचंदनगर : ग्राम पंचायतीचा निकाल काल जाहीर झाला असून पराभूत झाल्यावर तालुका इंदापूरच्या वालचंदनगरच्या काझड गावात दहशत निर्माण करण्यासाठी उमेदवाराने हवेत गोळीबार करून पळून जाताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरुटे असे या आरोपींचे नाव असून सोमवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत राहुल नरुटे व समीर नरुटे हे दोघे उभे होते.निकाल जाहीर झाल्यावर त्यांना पराभवाला सामोरी जावे लागले. या वरून संतापून राहुल नरुटे ने दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केले. पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्या पाठलाग केला आणि एक चौकात गाडी अडवली. पोलीस माघारीवर आहे हे बघून त्यांनी पोलिसांवर गाडी घालत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलीस हवालदाराने वालचंद पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited by - Priya Dixit